विदर्भाची समृद्धी आघाडी सरकारने रोखली – बावनकुळे यांचा आरोप

0

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. समृद्धी महामार्गाने संपूर्ण महाराष्ट्र विदर्भाशी जोडला जाणार आहे. हा मार्ग होऊ नये, याकरिता महाविकास आघाडीच्या कार्यकाळात बरेच प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते चांगले ठाऊक असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. भविष्यात समृद्धी महामार्गाशी गोंदिया, भंडारा जिल्हा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागात उद्योग येतील आणि येथील धान व इतर शेतमाल मुंबईत जाणे सोयीचे होईल. उद्योजकांनाही कनेक्टिव्हीटी मिळणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी खर्चात बचत होईल, असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला. दरम्यान, समृद्धी महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. त्यांच्याच कार्यकाळात या मार्गाचे काम सुरू झाले होते. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने समृद्धी महामार्गाचे काम रोखण्याचे बरेच प्रयत्न केले. हे प्रयत्न कुणी केले, हे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच ठाऊक आहे, असा आरोप केला. पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात आणखी काही मोठ्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वैदर्भीयांनी त्यांच्या स्वागतासाठी स्वयंस्फूर्तीने यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.


काँग्रेसने आजवर विदर्भाची उपेक्षाच केली. नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला. करार आणि घोषणा केल्या. मात्र दिले काहीच नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकारच येताच नागपूर तसेच विदर्भात विकासाची गंगा वाहू लागल्याचा दावा केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा