बीड – (BEED)बीड-परळी महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे. दिंद्रुड येथे गेल्या पंधरा दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज याच संदर्भात ग्रामस्थांनी रास्ता रोको (ANDOLAN)आंदोलन केले. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. ऐन सण- उत्सवात(Electricity) महावितरणने विद्युत पुरवठा बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक आहेत. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे.