नागपूर :(NAGPUR) छत्रपती शिवाजी महाराजांचे (SHIVAJI MAHARAJ)हिंदुत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. खरेतर आपण हिंदुस्थानातच राहतो हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. भाजप ज्यांना मानते त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती ते त्यांनी स्पष्ट करावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सातत्याने करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपचा देशाला हिंदुराष्ट्र करण्याच्या अजेंड्यावर ते बोलत होते. रविवारी नागपुरातील मविआचे सभेला सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील त्या ठिकाणी सभा होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केला.ही सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला.
(RAHUL GANDHI)राहुल गांधीची (UDDHAV THACKEARY)उद्धव ठाकरे भेट घेण्याचा अजून प्रोग्रॅम आला नाही. भाजप विरोधातील सगळे लोक देशात लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत. नितिश कुमार यांना संयोजक करण्यात आलेले आहे.. (BJP)भाजप विरोधात मोट बांधण्याचे काम सुरू आहे. भाजप विरोधी राजकीय पक्ष एकत्र आणण्याचे पर्यायाने देश वाचवण्याचे काम काँग्रेस करीत आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे संदर्भात छेडले असता पटोले म्हणाले, जाणीवपूर्वक लक्ष भरकटवण्याचे काम चालू आहे. महागाई वाढली याकडे खरेतर सत्ता पक्षाचे लोकांनी लक्ष घातलं पाहिजे मात्र याला तोडणे त्याला पक्षापासून तोडण्याचे काम चालू आहे जनतेने तुम्हाला जनतेला लुटण्यासाठी किंवा तोडा तोडीसाठी नाही. तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सत्तेत बसवलेले आहे त्यावर चर्चा केली पाहिजे.