सोलापूर – (solapur)सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुन्हे शाखेने (boramani)बोरामणी येथील पेट्रोल पंपामधून डिझेल चोरीची घटना उघडकीस आणत ही आंतरराज्य टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख २२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शिवसुंदर चिलोबा (HPCL)एच.पी.सी.एल या पेट्रोल पंपाच्या डिझेलच्या टाकीतून ४ लाख ६३ हजार किंमतीचे ५००० लिटर डिझेलवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता सदर आरोपी(KARNATAKA) कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. बातमीदाराच्या आधारे सर्व आरोपींचे ठिकाण (POLICE)पोलिसांना मिळताच सर्व सात आरोपींना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.आरोपींनी डिझेल चोरीची कबुली दिली आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111