मतदारांना ‘राईट टू रिकॉल’चा अधिकार हवा-उद्धव ठाकरे

0

अमरावती Amravati –  विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व सरकारवर हल्ला चढविला. पूर्वी सरकार मतपेटीतून यायचे मात्र, हल्ली ते खोक्यातून येत असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज ते खासदार नवनीत राणा यांचा मतदारसंघ असलेल्या अमरावतीमध्ये आहे. Ubhata chief Uddhav Thackeray, who is on a tour of Amravati-Vidarbha, attacked the BJP and the government. He criticized the rulers that earlier the government used to come from the ballot box, but now it comes from the box. प्रसार माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी ही टीका केली. उद्या कुणीही दमदाटी करून व पैशाचा वापर करून देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. नागरिकांना हे फोडाफोडीचे राजकारण चालणार आहे का? अशाने देशाचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळे मतदानात नोटासह निवडणुकीनंतर राऊट टू रिकॉलचाही अधिकार मिळायला हावा. त्यावर चर्चा करायला हवी, असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray on Right to Recall)

लोक मोठ्या विश्वासाने एखाद्या नेत्यावर, पक्षावर विश्वास ठेवून आपले लोकप्रतिनिधी निवडतात. नंतर तेच लोकप्रतिनिधी पैशांसाठी, खोक्यांसाठी दुसरीकडे गेले तर काय करायचे? अशावेळी जनतेनेच लोकप्रतिनिधीला निवडून दिले असेल तर त्याला परत बोलावण्याचा अधिकारही जनतेला द्यावा का?, यावर चर्चा करायला हवी. पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्षच चोरला जातो. हे एक नवे राजकारण भाजपने सुरू केले आहे. त्यासाठी अगदी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे आणि ते नाव मी कुठेही जाऊ देणार नाही. कारण माझ्या वडिलांनी, आजोबांनीच हे नाव पक्षाला दिले आहे, असे ते म्हणाले. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, अशी गत सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची झाली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे हे सध्या पक्षबांधणीसाठी अमरावतीत आहेत. अमरावतीमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा आज हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम करणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पावसाळ्यात बेडूक बाहेर पडल्याची टीका काल केली होती. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांचे पोस्टर फाडण्याचे प्रकार सुरु आहेत.