Accident ‘त्या’ मार्गावर पुन्हा अपघात : तिघांचा मृत्यू

0

रामटेक – भंडारा रोडवर Bhandara Road  एका ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण मृत्यूमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. हे कुटुंब रामटेक गडावरून देवदर्शन आटोपून भंडाराकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात ८ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक वृद्धासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. Three members of the same family were killed in a horrific accident involving a truck and a car on Ramtek-Bhandara road on Sunday evening. The accident took place when the family was on their way to Bhandara from Ramtek Fort after passing Devadarshan. 8 people were injured in this accident and they have been admitted to the hospital for treatment. The dead included an elderly woman and two young children.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश भेंडारकर (वय ३४) हे त्यांच्या कुटुंबीयांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दर्शनासाठी आले होते. रामटेक गड मंदिराचे दर्शन घेऊन ते आपल्या गावी परतत असताना रामटेक – भंडारा मार्गावरील आरोली खंडाळा गावाजवळ त्यांची कार उभ्या असलेल्या कंटेनर ट्रक क्रमांक एमएच ४० सीडी ९८०२ ला धडकली. यात हिमांशु भेंडारकर (८ महीने), भार्गवी बोंदरे (वय ८) आणि परसराम लहानु भेंडारकर (वय ७०) असे तिघे जण मृत्यूमुखी पडले. तर सिताबाई परसराम भेंडारकर (वय ६४), ऊन्नती राजेश भेंडारकर (वय ५०), दुर्गा राजेश भेडारकर (वय ३२), भाव्या चंद्रहास बेंद्रे (वय ८) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातातील जखमींना रामटेकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.