नागपूर-नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असल्याने मोठा दिलासा (Vidarbha Rain) मिळाला आहे. विदर्भासह राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही भागात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. शुक्रवारी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट म्हणजेच अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर नागपूर, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी यलो अॅलर्ट म्हणजेच जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















