मुंबई (Mumbai): सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही समाधानी असून जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते, त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे. लोक चुकीच्या चर्चा करीत होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (DCM Devendra Fadnavis on SC Verdict) राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणीवस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही समाधानी असल्याचे सांगताना लवकरच आपण सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.