टीम म्हणून काम केले की निकाल लागतोच – सुनील केदार

0

नागपूर :आम्ही जेव्हा टीम म्हणून काम करतो, तेव्हा त्याचे निकाल काय लागतात, हे जिल्हा परिषदेची निवडणूक, जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अभिजित वंजारी यांचा विजय आणि त्यानंतर आता नागपूर शिक्षक मतदारसंघातील सुधाकर अडबाले यांच्या विजयाने दाखवून दिले असल्याचे स्पष्ट मत माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले आहे. केदार-वडेट्टीवार यांनी सर्वात आधी डबाले यांना पाठिंबा दिला होता. नंतर मविआने शिवसेना उमेदवार गंगाधर नाकाडे यांना माघार घेण्यास लावत पाठिंबा दिला होता. केदार म्हणाले,हा महाविकास आघाडीच्या एकोप्याचा विजय आहे. हा एकोपा कायमस्वरुपी राहणार आहे. २०२४ मध्ये आणखी मोठे धक्के आमच्या विरोधी पक्षाला बसणार आहेत. कोण हरणार, हे आजच सांगू शकत नाही. पण आम्ही विजयी होणार, हे निश्‍चित असल्याचा दावा माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी केला.

आजच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असलेलेबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र राहिलो. आम्ही पूर्वीपासून कॉंग्रेसच्या विचारांचे आहोत. सर्वच्या सर्व ३४ संघटनांना आम्ही एकत्रित केले. त्यांच्यात एकमत घडवून आणले. सुधाकर अडबालेंना उमेदवारी दिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे भूमिका मांडली.शिक्षक मतदारसंघ हा संघटनांचा मतदारसंघ आहे, राजकीय नाही, हे आम्ही कॉंग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले. आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांनी ते मान्य केले.आज त्याचा परिणाम दिसत आहे.

 

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|