मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. निवडणूक आयोगाकडून या दर्जाचा फेरआढावा घेण्यात येत असल्याची माहिती (NCP`s National Party Status) आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मंगळवारी याबाबत सुनावणी देखील पार पडली असून पक्षाचे वरीष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात वकीलांनी या सुनावणीला हजेरी लावली होती, अशी माहिती आहे. आयोगाकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. आयोगाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आल्याची माहिती आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने यापूर्वी बसप, भाकप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांना 2019 साली नोटीस बजावण्यात आली होती. त्या वर्षीचा लोकसभा निवडणुकीतील संबंधित पक्षाची कामगिरी पाहता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढून घेऊ नये, असा मुद्दा आयोगाकडून उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा जाण्याची शक्यता नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी विश्वासाने सांगितले. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची आणि निवडणुक आयोगातील अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अबाधित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महाराष्ट्रासह केरळ, झारखंड आणि नागालँड या राज्यांमध्ये आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा कायम राखण्यासाठी असलेल्या अटी पूर्ण होत असल्याने आम्हाला कुठलीही अडचण नाही, असा विश्वासही तपासे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार? निवडणूक आयोगाकडून फेरआढावा
Artical Blog
Hindi News
Artical Blog
















