मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे. मात्र, आता शरद पवार माघार घेतील, असे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर बसलेल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना पवारांनी आज अप्रत्यक्षपणे तसे संकेत दिले (NCP Leader Sharad Pawar) आहेत. “पक्षाच्या भवितव्यासाठी मी हा निर्णय घेतला. नवे नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने मी या निर्णयापर्यंत पोहोचलो. पण माझ्या घोषणेनंतर पक्षातल्या सगळ्या सहकाऱ्यांची तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करुन मी येत्या २ दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावना दुर्लक्षित होणार नाही, याची खरबरदारी घेईन. त्याचवेळी तुम्हाला २ दिवसांनी असे पायऱ्यांवर आंदोलनाला बसावे लागणार नाही..” असे उद्गार पवारांनी यावेळी काढले. त्यामुळे पवार हे माघारीच्या मनस्थितीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मुंबईत वाय.बी. चव्हाण सेंटर येथे आंदोलनाला बसले होते. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी ते आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाची दखल घेत पवारांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निर्णयाच्या फेरविचाराचे संकेत दिलेत. पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडात करीत आनंद व्यक्त केला. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
तुमच्या भावनांचा आदर करुन १ ते २ दिवसांत निर्णय – शरद पवार
मुंबई : जर कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता तर त्यांचा इतका विरोध पुढे आला नसता, तुमच्यासोबत चर्चा केली असती तर हे चित्र नसते तुमच्या भावनांचा आदर करुन १ ते २ दिवसांत निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा शरद पवार यांनी स्पष्ट केले. दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांना असं बसायला लागणार नाही. मी जो निर्णय घेतला तो चुकीचा होता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तो निर्णय घेतला पाहिजे होता असे स्पष्ट संकेत मिळाल्याने उद्या काय होणार याविषयीची उत्सुकता सर्वाना लागली आहे