घरी बसेन पण राजकीय तडजोड करणार नाही : राज ठाकरे

0

 

मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.
राज्यामध्ये सध्या व्यभिचार सुरू आहे. तशीच वेळ आली तर मी घरी बसेन पण तडजोड करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी चिपळूण येथे ही भूमिका मांडली.
राज ठाकरे म्हणाले, येत्या पंधरा दिवसात मी विविध ठिकाणी मिळावे घेणार असून त्यात भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागेल. अन्यथा त्यांना पदावर राहता येणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन, पण तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यातून राज ठाकरे यांनी आगामी राजकीय वाटचाल स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.