
पुणे, १३ जुलै : भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून ती २० फूट खोल खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात भीषण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने एकच धावपळ उडाली होती.Bhimashankar-Kalyan ST bus overturns accident five injured
मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर येथे जाणारी एसटी बस MH 14 BT 1582 ही आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून बस थेट २० फूट खोल खाली कोसळल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. तर अन्य काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचत जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिली. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.
काल, बुधवारी सकाळी सप्तश्रृंगी गडावरून खाली उतरत असलेली एसटी बस ४०० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला होता. त्यात एका महिलेचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले होते. त्यामुळे दोन दिवसात एसटी बस अपघाताची ही दुसरी घटना आहे.