नागपूर : मूळचे नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त पदाची सूत्रे पुणे येथे नुकतीच स्वीकारली. यावेळी बालविकास उपायुक्त राहुल मोरे, प्रशासन उपायुक्त श्रीमती वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले.
राज्य सरकारने समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथून महिला व बालविकास विभागात आयुक्त या पदावर डॉ. प्रशांत नारनवरे यांची बदली करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील २००९ बॅचचे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण आयुक्त म्हणून यापूर्वी कार्य केले आहे. डॉ. नारनवरे यांनी सांगली येथील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, पालघरचे जिल्हाधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको सारखे अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत.