यशवंत मोहिते पीआरएसआय नागपूर चॅप्टरचे नवे अध्यक्ष सोनी सचिव

0

(Nagpur)नागपूर -पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI) नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी यशवंत मोहिते यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
बिजली नगर अतिथीगृह, सदर येथे PRSI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाजेनकोचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष एस.पी.सिंग यांनी प्रस्ताव मांडला, त्याला उपस्थित सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला. अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये (Akhilesh Halve)अखिलेश हळवे (महामेट्रो) उपाध्यक्षपदी,(Manish soni)मनीष सोनी (नागपूर महानगरपालिका व नागपूर स्मार्ट सिटी) यांची सचिवपदी,(Prasanna Srivastava) प्रसन्न श्रीवास्तव (महावितरण) सहसचिवपदी आणि (Sharad Marathe)शरद मराठे (मध्य प्रदेश पर्यटन मंडळ) यांची खजिनदारपदी निवड झाली. (Pravin Take)प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी),(Dr. Manoj Kumar)डॉ. मनोज कुमार (वेकोली), प्रवीण स्थूल (महावितरण), अमित बाजपेयी (एएए मीडिया) आणि निखिल सावरकर (पीआर टाईम्स) यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. हेमराज बागुल (माहिती संचालक), डॉ. मोईस हक, डॉ. नितीन कराळे, प्रदीपकुमार मैत्र, शिरीष बोरकर, अनिल गाडेकर, एमएम देशमुख आणि एसपी सिंग हे संस्थेचे मार्गदर्शक/ सल्लागार म्हणून काम पाहतील. जनसंपर्क कर्मचार्‍यांची ही संघटना गेल्या अडीच दशकांपासून नागपुरात कार्यरत आहे, हे विशेष.