देवेंद्र फडणवीस यांना कोणी डॅमेज करू शकत नाही – बावनकुळे

0

(Amravti)अमरावती-छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना अध्यक्ष व्हायचे की अजित पवार की जयंत पाटील यांना ठेवायचं
हा अधिकार शरद पवार यांना आहे.
त्याच्या पक्षातील घडामोडींवर बोलण्याचा आमचा संबंध नाही. खरेतर शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर वाटल होतं ते राजीनामा परत घेणार नाही कोणाला तरी अध्यक्ष करतील मात्र त्यांनी तसं केलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेबद्दल कोणी काही बोलले तरी त्यांना कोणी डॅमेज करू शकत नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
कोणी तक्रार केली त्या तक्रारींच्या आधारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत असते. विरोधक आरोप करीत असलेत तरी त्याच्याच काही नेत्यांनी प्रभाग पध्दतीवर कोर्टात केस टाकली आहे त्यामुळे उद्या निकाल आला तर उद्या निवडणूक होईल. ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल असा अंदाज आहे. मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहचवण्याचा प्रयत्न मी करेन. (Sanjay Raut)संजय राऊत यांना उत्तर देण्याकरिता आमचे प्रवक्ते नितेश राणे आहेत. अंबादास दानवे यांनी अडीच वर्षे आधी मविआ सरकारमध्ये काय झालं हे तपासले पाहिजे.त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावं लागते म्हणून ते बोलतात असा टोला लगावला.