ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है….! – -गडकरी म्हणाले,

0

जे बोललो ते करून दाखविले, उत्तर ते दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या 8.9 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांची उपस्थिती

नागपूर : येत्या सहा महिन्यात नागपूरच्या सर्व भागात 24 तास पाणी मिळेल.मोठ्या प्रमाणावर घरकुले बांधली जात आहेत. आयआयएम, लॉ कॉलेज,सिंबोसिस अशाप्रकारे शिक्षणाचे हब नागपूर झाले आहे. दहा वर्षे नागपूरचा खासदार म्हणून काम करताना अजूनही एक वर्ष बाकी आहे दिलेला शब्द मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला. दहा वर्षे पूर्ण होताना ‘मिहान’ प्रकल्पात 1 लाख लोकांना रोजगार हा शब्द देखील आम्ही पाळू, नावासह यादी जाहीर करू, अभी तो ये ट्रेलर है विकास कामे बाकी है, असली फिल्म अभी बाकी है…! अशा फिल्मी अंदाजात आज केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना जिंकले. उत्तर ते दक्षिण नागपूरच्या 8.9 किलोमीटर लांबीच्या सुमारे 998.27 कोटी रुपयांच्या आरओबी,आर यु बी चा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन प्रसंगी ते सक्करदरा येथील जाहीर सभेत बोलत होते. जलकुंभ उदघाटन,रामझुला वाय उड्डाणपूल, लोखंडी पूल नवा आरयुबी लोकार्पणही आज झाले. विशेष म्हणजे या पूलासाठी कुठल्याही व्यापाऱ्याची एक इंच जागा जाणार नाही अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. कमाल चौक,गोळीबार चौक, सक्करदरा चौक अशा तीन ठिकाणी या प्रकल्पाचा समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार विकास महात्मे आमदार मोहन मते,प्रवीण दटके,कृष्णा खोपडे, विकास कुंभारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गेले अनेक वर्षे या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी बघता अनेकांची उड्डाणपुलाची मागणी होती ती आता पूर्णत्वास जात आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेच्या आर यु बी आरओबीचे काम केले जाईल तीन वर्षात हा पूर्ण प्रकल्प पूर्ण होईल. दुकानदाराची, नागरिकांची एक इंचही जमीन या पुलासाठी घेतली जाणार नाही. मलेशियाचे तंत्रज्ञान वापरून हा पूल अत्याधुनिक पद्धतीने बांधला जाणार असून तब्बल 1600 कोटी रुपयांचे काम असताना सहाशे कोटी रुपयांची बचत होणार आहे. सक्करदरा तलावासाठी 40 कोटी रुपये राज्य शासनाने दिले या जागी फूड प्लाझासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, नागपुरात आम्ही बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर 50 वर्षे नागपुरात खड्डे पडणार नाहीत असा दावा केला. या माध्यमातून नगरसेवक,अधिकारी नाराज होतील होऊ द्या मात्र जनता खुश आहे या शब्दात गडकरी यांनी आपल्या विकास कामांचा पाढा वाचला. नागपूरच्या सर्व भागात आम्ही काम केले. गेल्या नऊ वर्षात जे सांगितले ते केले. यासोबतच रिंग रोडवर ई बस सेवा मेट्रोला दिली आहे. अंभोरा तीर्थक्षेत्रासाठी 200 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत.जिल्ह्यात सर्वांगीण, चौफेर विकास होत आहे मात्र हे श्रेय माझे किंवा देवेंद्र फडणवीस यांचे नाही तर आम्हाला हे संधी देणाऱ्या जनतेचे आहे असेही गडकरी म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमणूक झाल्याने आपली मोठी अडचण झाली. मला पालकमंत्री होण्याचा अनुभव नव्हता थेट मुख्यमंत्री झालो. बावनकुळे पालकमंत्री म्हणून सर्व कामे करून घेत होते या कामी ते सराईत आहेत आता सर्व कामे मलाच करावी लागतात या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हंशा पिकविला.