उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना : तिघांची प्रकृती चिंताजनक
मसुरी. उत्तराखंडमध्ये मसुरी -डेहराडून मार्गावरून (Mussoorie-Dehradun route in Uttarakhand ) जाणारी प्रवासी बस दरीत कोसळून (Bus fell into the valley) मोठी दुर्घटना घडली. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दोन मुलींचा जागेवरच मृत्यू (Two girls died on the spot ) झाला. तर बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी तात्काळ पोलिस, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मसुरी पोलिसांकडून देण्यात येत आहे. अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 22 प्रवासी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तराखंडच्या घाट असलेल्या मार्गांवर प्रवासी व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे अपगातांची संख्या बरीच कमी झाली आहे. आज झालेल्या अपघातानंतर अधिक उपाययोजनांची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.
प्रमुख मार्ग असलेल्या मसुरी -डेहरादून दरम्यान शेरगडीजवळ हा अपघात घडला. अपघातग्रस्त बस मसुरीहून देहरादूनकडे चालली होती. या महामार्गावरुन जात असलेल्या बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नेमके वळण घेत असताना हा प्रकार झाल्याने बस अनेक फूट खोल असलेल्या दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच मदत उपलब्ध करून देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर जवळील लंढौर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे. माहिती मिळताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पर्यटक व स्थानिकांसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मार्गावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे पावसाळा वगळता अपघाताच्या घटना बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत. मात्र, अती वेगामुळे अधूनमधून अशा घटना घडतच असतात. मर्यादित वेगात वाहन चालविल्यास अपघात टाळले जाऊ शकतात. याबाबत जनजागृतीही केली जात आहे. मात्र, त्यानंतरही अनेकवेळा वेळ वाचविण्यासाठी म्हणून गती वाढविली जाते आणि हाच प्रकार जीवघेणा ठरतो.