पुणे PUNE : पुणे शहरातील सदाशिव पेठेत Sadashiv Pethe पेरुगेट पोलीस ठाण्याजवळ मंगळवारी सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका MPSC एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने एक तरुण तिच्या मदतीसाठी धावल्याने तरुणीचा जीव वाचला. या तरुणाने जीवाची पर्वा न करताना तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.Coyote attack on young woman in Pune, young man saved his life
शंतनू जाधव ( वय 22) Shantanu Jadhav (Age 22) असे हल्लेखोर आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांनी जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.मंगळवारी सकाळी टिळक रोडवर ही घटना घडली. सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास रस्त्यावर एक तरुणीर जीवाच्या आकांताने पळत असल्याचे व तिच्यामागे एक तरुण हाती कोयता घेऊन धावत असल्याचे दृष्ट सकाळी अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवले. रस्त्यावर मोठी गर्दी असूनही सुरुवातीला कोणीही त्यात हस्तक्षेप केला नाही. त्याचवेळी सदाशिव पेठेत एमपीएससीची तयारी करणारे तरुण हे अभ्यासिकेत जात होते. त्यांच्यापैकी लेशपाल जवळगे या तरुणाने कोयता हिसकावून घेत तरुणीचे प्राण वाचविले. हल्लेखोर तरुणाला पकडून सुरुवातीला चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
काय म्हणाली तरुणी?
हल्लेखोर तरुणीने प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले की, तो माझा मित्र होता. त्याला मी नाही म्हटले म्हणून त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तो माझा काही दोष नसताना कॉलेजपशी येऊन मला मारहाण करायचा. नाही म्हटले म्हणून तो माझा पाठलाग करायचा. त्याच्या घरच्यांच्या सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. घरच्यांना सांगितल्याचा वचपा काढण्यासाठी त्याने आज माझ्यावर हल्ला केला, असे तिने सांगितले. या तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून टाके घालण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.