Home Breaking news कामगारांचा आक्रोश आणि रक्ताचा सडा!

कामगारांचा आक्रोश आणि रक्ताचा सडा!

0

नागपूर (Nagpur) :-  नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. राऊळगाव येथील ‘एसबीएल’ (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मृतांचा आकडा १५ पर्यंत पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली. खाणींमधील खोदकामासाठी लागणारे डिटोनेटर तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि परिसरात धुराचे लोट पसरले.

स्फोटाच्या वेळी कंपनीच्या संबंधित युनिटमध्ये २५ ते ३० कामगार कार्यरत होते. या दुर्घटनेत १८ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये सर्व महिला कामगारांचा समावेश आहे. त्यापैकी ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.