Home Artical Blog भारतीय कृषी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

भारतीय कृषी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

0

नागपूर(Nagpur) :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या वर्ग 12 चा निकाल दि.
02/4/2026 रोजी ऑनलाईन जाहिर करण्यात आला यामध्ये भारतीय कृषी ज्युनिअर कॉलेज झिंगाबाई
टाकळी नागपूर चा विज्ञान व कला वाणिज्य या विभागाचा निकाल 100 % लागलेला आहेत यामध्ये विज्ञान
विभागातून 30 विद्यार्थीनी प्राविण्यप्राप्त केले तर 80 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. वाणिज्य
विभागातून 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये व आर्टस विभागातून 14 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांनी निकालामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कॉलेजच्या सायन्स विभागातून:
1) वेदांग बन्सोड 87.67%
2) सारंग भुजाडे 84.83%
3) अबुजार अहमद शेख 83.50%
4) सुमया दिवे 82%
5) श्रेयश फिक्से 81.67%
6) सार्थ श्रीवास 81.33%
7) तनिष्का शेंडे 80.17%
8) सम्यक डेंगरे 78.67%
9) नर्मता अतुल अंबरते 77.83%
कॉमर्स विभागातुन:
1) अनुष्का देऊळकर 83.84%
2) कु. खुशी चव्हाण 79.69%
3) भावेश खवले 78.23%
आर्टस विभागातून:
1) खुशी पोटोडे 71.30%
2) तेजस्वीनी मलावी 69.15%
3) कु. प्रियंका चव्हाण 67.46%

संस्थेचे अध्यक्ष मा. बाळासाहेब पन्नासे, सचिव राकेशभाऊ पन्नासे, प्राचार्य अर्चना पन्नासे मॅडम, पर्यवेक्षिका
दिपीका तुपकर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण विद्यार्थांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना दिल्या.