
PUNE पुणेः ( 10 th result ) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. (SSC Result 2024) निकालात पुन्हा एकदा कोकण विभाग आघाडीवर असून (98.11 टक्के) नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९२.०५टक्के आहे. तर अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के आहे. वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी १५ लाख ४१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेत ९२.४९ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. हा निकाल mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी अशीः
पुणे : ९५.६४ टक्के, नागपूर : ९२.०५टक्के, औरंगाबाद : ९३.२३ टक्के, मुंबई : ९३.६६ टक्के, कोल्हापूर : ९६.७३ टक्के, अमरावती : ९३.२२ टक्के, नाशिक : ९२.२२ टक्के, लातूर : ९२.६७ टक्के, कोकण : ९८.११ टक्के,