गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू लुधियानात मोठी दुर्घटना, 11 जण बेशुद्ध

0

लुधियाना. पंजाबमधील लुधियानामध्ये (Ludhiana, Punjab ) मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी शहरातील ग्यासपुरा औद्योगिक क्षेत्राजवळील (Gyaspura Industrial Area ) निवासी इमारतीत गॅस गळतीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला (11 people died due to gas leak). मृतांमध्ये 2 मुलांसह 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. मुले 10 आणि 13 वर्षांची आहेत. 11 जण बेशुद्ध पडले आहेत. दुर्घटना घडली त्या इमारतीत मिल्क बूथ होते आणि जो कोणी सकाळी येथे दूध घेण्यासाठी गेला तो बेशुद्ध पडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आत लोक बेशुद्ध पडले आहेत. कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचे कारण काय, ही माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. प्राथमिक तपासणीत गॅसचा वास सीवरेजच्या गॅससारखा असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे सांगण्यात आले.

सुआ मार्गावरील गोयल कोल्ड ड्रिंक्स इमारतीतून गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या वरच्या भागात लोक राहत होते. तेसुद्धा बेशुद्ध झाल्याचीही शक्यता आहे. बाधितांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. तुर्त परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबविले जात आहे. मृताचा आकडा 11 सांगितला जात असला तरी हा आकडासुद्धा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. एनडीआरएफची टीम मास्क घालून इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. लुधियानाच्या ग्यासपुरा भागात गॅस गळतीची घटना अत्यंत वेदनादायक आहे. पोलिस, प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी हजर आहे. शक्य ती सर्व मदत केली जात आहे. याबाबतची संपूर्ण माहिती लवकरच देण्यात येईल.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अचानक गॅस लीक झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. हा गॅस जवळच्याच फॅक्टरीमधून लीग झाला, असा दावा स्थानिकांनी केला आहे. या वायुगळतीबाबत माहिती मिळताच लोकांची पळापळ सुरू झाली. तसेच अनेक लोक पळून फॅक्टरीपासून दूर पोहोचले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117