शेतकऱ्यांनी मारलेली पहिली लाथ संजय राऊत यांची टीका

0

मुंबई. (MUMBAI)कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारी संस्था आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi ) निर्विवाद यश मिळाले आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातील शेतकरी शिंदे-फडणवीस सरकारला वैतागला आहे. शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कंबरड्यात ही पहिली लाथ मारली आहे. महत्त्वाचे म्हणजे मिंधे गटातील आमदारांच्या मतदारसंघात आमची पॅनल विजयी झाली आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या मनात नेमके काय आहे, हे स्पष्ट आहे, अशा बोचऱ्या शब्दात उबाठा शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी जळजळीत टीका केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे, हा लोकमताचा कौल असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील(Agricultural Produce Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल शनिवारी जाहीर झाले आहेत. यात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना चांगलाच धक्का बसला आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त बाजार समित्यांवर झेंडा फडकवित निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत निकालावर प्रतिक्रिया देतानाच सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोळ उठविली होती. बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेसह महविकास आघाडीस उत्तम यश मिळाले. गद्दार आमदारांचा शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केला. हेच महाराष्ट्राचे जनमानस आहे. ही सुरुवात आहे. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल. लोकांनी खोके लाथाडले. हे स्पष्ट दिसते. हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

प्रस्तापितांना धक्के

राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना मंत्रांनी जबर धक्का बसला आहे. या नाशिकचे पालकमंत्री (DADA BHUSE)दादा भुसे यांना होम पीचवरच मोठा धक्क बसला आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे.
या निवडणुकीत सोसायटी गटातून अकरा पैकी दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा झटका बसला आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देखील जबर धक्का बसला आहे. तसेच मंत्री संजय राठोड अशा अनेक दिग्गज मंत्र्यांना शेतकऱ्यांनी नाकारले आहे.

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117