चंद्रपूर. (Chandrapur)काँग्रेस – भाजपाने (Congress – BJP ) युती करीत चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत (Chandrapur Bazar Committee Elections ) काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर समर्थित गटाचा धुव्वा उडवला. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ढोल, ताशाच्या ठेक्यावर गुलाल उधळण करीत बेफाम होत नाचले. त्यांच्या एकत्रित डान्सचा व्हीडोओ तुफान व्हायरल (video of the dance together went viral ) होत असून तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. . खासदार धानोरकर यांच्या पराभवासाठी या अभद्र युतीला आजी माजी पालकमंत्री (SUDHIR MUNGANTIWAR)सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होता हे काही लपून राहिलेले नाही. कायम एकमेकाच्या विरोधात उभे ठाकणारे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र दिसले.
या निवडणूकीत १८ पैकी १२ संचालक भाजप व काँग्रेसच्या युतीचे निवडुन आले. खासदार धानोरकर समर्थित चोखारे गटाचा भाजप काँग्रेस युतीने पराभव करताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र विजयोत्सव साजरा केला. मात्र, हा विजयोत्सव साजरा करता आपण काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याचे विसरलेले दिसले. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राजकीय विरोधक आहेत. मात्र, चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीत ही ओळख पुसली गेली. खासदार धानोरकर गटाच्या दिनेश चोखारे यांचा पराभव होताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यकत्र्यांसह एकत्र येत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. या खेळीनंतर राजकारणत काहीही होऊ शकते याची नागरिकांनी कल्पना आली आहे. भाजप व काँग्रेस ची ही राजकीय युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर यांच्यासाठी धोकादायक ठरणार आहे.