आजपासून १२ वीची परीक्षा

0

विभागातील १,५५, ९१३ विद्यार्थ्यांचा समावेश

नागपूर. राज्य शिक्षण मंडळाची (State Board of Education) बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली (12th exam has started from today). नागपूर विभागातील सर्व ६ जिल्ह्यांतील एकूण १,५५,९१३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात ७६,५७१ विद्यार्थिनी आणि ७९,३३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ६२,५४९ विद्यार्थ्यी परीक्षा देत आहेत. प्रशासनाने यंद कॉपीमुक्त परीक्षेवर भर दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात बहुस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारीपथक असेल. ते जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर धडकून माहिती घेऊ शकतील. तालुका स्तरावरही एक भरारी पथक असेल. त्यात शस्त्रधारी पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश राहील. या शिवाय प्रत्यक्ष केंद्रातही पोलिस कर्मचाऱ्यासह महसुल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरपेपरला कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली जाणार आहे. याशिवाय शाळेजवळील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आले आहे.
नागपूर विभागात एकूण विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेचे ७६,१०२ विद्यार्थी, कला शाखेचे ५४,१३९, वाणिज्य शाखेचे १९,१२५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. याशिवाय एमसीव्हीसीचे ६,१५८ आणि आयटीआयचे ३८९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षा केंद्रावर प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची झडती घेण्यात आली. तालुकास्तरीय भरारी पथकांसह नागपूर विभागीय मंडळाने ८४ भरारी पथके सज्ज केली आहेत. यंदाविभागात १० तृतीयपंथी विद्यार्थीसुद्धा परीक्षा देणार आहेत. त्यातील सर्वाधिक ५ नागपूर जिल्ह्यातील आहेत. भंडाऱ्यातून २ तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

३ वर्षांनंतर सुरळीत परीक्षा
तब्बल तीन वर्षांनंतर यंदा नेहमीच्या पद्धातीने बोर्डाच्या परीक्षा होत आहेत. २०२१ मध्ये कोरोना संकटामुळे दहावी, बारावीची परीक्षा झाली नव्हती. त्यावेळी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान करण्यात आले होते. २०२२मध्ये कोरोनाचे संकट कायमच होते. यामुळे शाळा तेथे केंद्र पद्धतीने परीक्षा झाल्या. त्यातही २५ टक्के अभ्यासक्रम कमी आणि अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना मिळाला होता. तीन वर्षांनंतर सुरळीत परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचीसुद्धा कसोटी आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा