नागपूर : ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांची वाढलेली संख्या आणि वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन चार वाघिणींचे स्थलांतरण करण्याच्या वन विभागाच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींचे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केले जाणार असून त्यासाठी वन विभागाने १५ कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केली (Shifting of two tigress from Brahmapur Forest Area) आहे. या मोहिमेसाठी भारतीय वन्यजीव संस्थेचे तज्ज्ञ बिलाल हबीब यांची मदत घेतली जात आहे. वाघिणींचे हे स्थलांतरण यशस्वी ठरल्यास आणखी दोन वाघिणींना येथे हलविण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणींना सोडण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला. पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांत दोन वाघिणींना सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात वाघांची संख्या जास्त असल्याने चार वाघिणी सोडून समतोल साधण्याचे प्रयत्न होणार आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची संख्या चांगली तेथे वाघांना शिकार सहज उपलब्ध होऊ शकेल, ही बाब लक्षात घेऊनच या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.
वाघांच्या स्थलांतरणासाठी वन विभागाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेतली आहे. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरलाच यासंदर्भात मंजुरी मिळाली आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांच्या अतिरिक्त संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येथील वाघांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी मे २०२२ मध्ये मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर एनटीसीए च्या तांत्रिक समितीकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या तज्ज्ञांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प परिसराची पाहणीही केली होती.
ब्रह्मपुरी वन क्षेत्रातून दोन वाघिणींच्या स्थलांतरणासाठी नवेगाव-नागझिरा सज्ज
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा