नाव, चिन्हासाठी २ हजार कोटींचा सौदा

0

 

संजय राऊतांचा खळबळजनक आरोप : ट्विटरवरून मोठा दावा

मुंबई. निवडणूक आयोगाने (Election Commission ) शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह (Shiv Sena is the party name and Dhnushyaban is the party symbol ) दोन्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला देण्यात आले आहे. शिंदे गटासह भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी या निर्णयाचे स्वगत केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी पुण्यातील कार्यक्रमात प्रथमच या विषयावर जाहीर भाष्य केले. या निर्णयाचे स्वागत करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशानाही साधला होता. ठाकरे गटासह राज्यातील विरोधा पक्षांकडून मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी MP Sanjay Raut ) शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा हा आरोप आहे. नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी ट्विटरवरून केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी रात्री हे ट्वीट केले आहे. त्यात माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, अशा या ओळी आहेत.
खोक्यांचा आरोप सुरूच
शिवसेनेत उभी फुट पडली, तेव्हापासूनच ठाकरे गटाकडून शिंदे गटावर मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला जात आहे. ५० खोक्यांतून आमदार, खासदार जोडले गेल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासूनच हा आरोप आजही कायम आहे. राज्यातील विरोधी पक्षांकडून शिंदे गटाचा ५० खोके असाच उल्लेख केला जात आहे. ऐवढेच नाही तर गद्दार म्हणूनही संबोधले जात आहे. आजवर काही कोटींमध्ये असणारा हा आकडा राऊत यांनी हजार कोटीच्या घरात नेऊन ठेवला आहे.