उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत यावे राज्यातील मंत्र्यांनी डिवचले

0
uddhav thackeray

मुंबई. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गाटातील नेत्यांचा आत्मविश्वास फारच वाढल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनाच टार्गेट करून डिवचण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांच्या समर्थकांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्नकरीत तोंडसुख घेतले जात आहे. अशातच राज्य सरकारमधील शिंदे गटाकडून मंत्रीपद मिळालेले संदिपान भूमरे (Minister Sandipan Bhumare ) यांनीही उद्धव ठाकरेंना शिवसेनेच येण्याची खोचक ऑफर देऊन टाकली. ज्यांच्याविरोधात बंड केले, त्यांनाच आपल्याकडे बोलवत जखमेवर मीठ चोळण्यासह डिवचले आहे. कायम शांत स्वभावी भासणारे भुमरे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील सांकृतिक परंपरा लक्षात घेऊन अशाप्रकारची विधाने टाळली जावित, असा महप्रवाहसुद्धा पुढे येऊ लागला आहे.
शिंदे गटातले मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पक्षात आता फक्त बाप लेकच शिल्लक राहिल्याची टीका भुमरे यांनी केली आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयाने आम्हाला न्याय मिळाला आहे. या निकालानंतर आता ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार खासदारसुद्धा आमच्याकडे येतील. त्यामुळे पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. त्यांनीही आता आमच्या पक्षात यावे. चिन्ह आणि नाव आम्हालाच मिळणार याची आम्हाला खात्री होतीच, असंही भुमरे म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, “हा निकाल बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला आहे. धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार याचा आम्हाला विश्वास होता. कारण ४० आमदार, १३ खासदारांसह १० अपक्ष आमदार आणि अनेक नगरसेवकही बाळासाहेबांची शिवसेनेत होते, असेही ते म्हणाले
अजित पवारांनी केले होते आरोप
विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी पैठण येथे शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मंत्री संदीपान भुमरे यांनी तालुक्यात ९ दारूची दुकाने आणलीत, सोबतच लोकांनी दारूच्या दुकानात जावे यासाठी दुकानासमोर स्पीड ब्रेकरही लावल्याचा आरोप केला होता. आपण शाळा, महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर लावतो; मात्र भुमरेंनी दारूच्या दुकानासमोर ब्रेकर लावलीत, जेणेकरून लोकांनी गाडी थांबवून दारूचे सेवन करावे. भुमरे हे पाप कुठे फेडाल, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली होती. त्यावेळी भुमरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
अजित पवार यांनी पैठण येथे शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली असून, त्याठिकाणी एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, “औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करून 13 वर्ष झालीत, पण हा रस्ता कुठपर्यंत झाला? 13 वर्ष जर तुम्हाला रस्ता करता येत नसेल तर ब्रम्हदेव आला तरी तुमचे काही भले होणार नाही. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचनाचे आता काहीही खरं नाही” अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा