गर्जा महाराष्ट्र माझा,राज्यगिताचा चांद्यातून शुभारंभ

0

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

चंद्रपूर. सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Maja) या गिताला राज्याच्या मंत्रीमंडळाने (State Cabinet ) राज्यगीताचा दर्जा दिला (given the status of State anthem ) आहे. या घोषणेनुसार शिवजयंतीच्या पर्वावर चंद्रपूर येथून या राज्यगीताचा शुभारंभ करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या चंद्रपूर भुमीतून राज्य गिताचा ऐतिहासिक शुभारंभ होतो असून त्या आपल्याला मनस्वी आनंद असल्याची भावना सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या ३५० व्या राज्यभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस असल्याचे ते म्हणाले. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधील मुगंटीवार पुढे म्हणाले की, जय भवानी…जय शिवाजी हे केवळ शब्द नाही तर उर्जा, उत्साह देणारे शब्द आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होते, वीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते. त्यांचे आचरण २४ कॅरेट सोन्यापेक्षाही शुध्द होते. शिवाजी महाराजांचा पर्यायी शब्द म्हणजे ‘परीस’ असल्याचे ते म्हणाले. विक्की दुपारे व विजय पारखी यांनी राज्यगीत सादर केले. प्रास्ताविक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. संचालन रवी गुरनुले यांनी केले. यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महापौर राखी कंचार्लावार, संजय कंचार्लावार, राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, संदीप आवारी उपस्थित होते.
म्हणूनच १० नोव्हेंबरचा मुहूर्त
औरंगजेबाची क्रुरता सर्वांना माहित आहे. या क्रुरतेविरुध्द भयमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांची भगवा झेंडा हाती घेतला. चोर वाघनखाने अफझजखानाचे पोट फाडून कोथळा बाहेर काढण्याचे काम महाराजांनी केले. मात्र २९ जुलै १९५३ पासून अफझलखानाचे उदात्तीकरण सुरू झाले. उदात्तीकरण क्रुरतेचे होऊ शकत नाही. विरतेचे होईल. म्हणूनच ५ नोव्हेंबर २०२२ ला राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आपण गुप्त बैठक घेतली. अफझलखानच्या कबरीजवळ असलेले ०.२२ हेक्टरचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी अतिक्रमण हटविले. १० नोव्हेंबराच छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता, यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी हा दिवस निवडण्याचे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा