धाराशिव – तब्बल १५ वर्षानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी व कोट्यवधी भाविकांचे दैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरातील दान पेट्यांची कायदेशीर मोजदाद सुरू आहे. चार दिवसातच तब्बल २०७ किलो सोने व ३५४ मौल्यवान हिरे आढळले आहेत. मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी मोजदाद करण्यासाठी महंत, पुजारी मंडळाचे अध्यक्ष व कर्मच्याऱ्यांची समिती तयार केली असून निष्णात सोनाराकडून त्याची खातरजमा केली जात आहे. ही मोजणी आणखी २५ दिवस चालणार असल्याचे सांगितले जात आहे. करोडो रुपयाचे दान पेटीत जमा झाले असून या दानरूपी अखेरच्या आकड्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.