मुंबई: भारताच्या संविधानाच्या चौकटीत राहुन आपण देशाची, राज्याची सेवा कशी करु शकतो याकडे लक्ष देणार असून माझे रिपोर्टिंग प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना असेल असे खा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष नियुक्तीनंतर त्या प्रथमच बोलत होत्या.जे काही निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होतात ते सर्वांना विचारुन चर्चा करुनच होतात.अजित पवार हे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते आहेत. अर्थातच विरोधी पक्ष नेत्यांची जागा ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने असते. आज राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका मोठी आहे. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा तीन बोट ही टिका करणाऱ्याकडे असतात हे विसरुन चालणार नाही. सोयीप्रमाणे लोकांना पवारांची घराणेशाही दिसते. भाजपने विरोधी पक्षांना संपवायच्या आधी स्वत:च्या पक्षांना आधी संपवलेलं आहे अशी टीका केली. कार्यकारी अध्यक्षपद मिळेल याची कल्पना नव्हती. महिला व पुरुष यांना समान अधिकार मिळावेत ही आमची भूमिका आहे.