जिल्ह्यातील 2,500 बालके व्याधिग्रस्त ! ‘सुदृढ बालक’ अभियानात भयान वास्तव आले पुढे

0

 

नागपूर:  रोगाचे वेळेत निदान करता आले, तर उपचाराची दिशा ठरवू भावी पिढीचे आरोग्य बळकट करता येईल, या उद्देषाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने (Department of Public Health and Family Welfare ) 9 फेब्रुवारीपासून राज्यात ‘जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान’ हाती घेतले. या अंतर्गत 0 ते 6 आणि 6 ते 18 वयोगटातील बालकांची आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील किशोरवयीन बालकांची तपासणी (Adolescent screening ) केली. त्यासाठी जिल्ह्यात १९५ आरोग्य पथके नेमण्यात आली. पथकाने आतापर्यंत जिल्ह्यात १.४३ लाखांहून अधिक बालकांची तपासणी केली असून, यापैकी 2 हजार 438 बालके विविध व्याधिंनी ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बालकांना पुढील उपचारासाठी जवळच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सामुदायिक आरोग्य अधिकारी(सीएचओ), आरबीएसके आदींचे तब्बल १९५ पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकामार्फत ९ फेब्रुवारी ते ९ एप्रिल 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, शाळाबाहेरील मुले अशा सुमारे दोन लाखांवरील बालकांची तपासणी करणे अपेक्षित आहे.

त्यानुसार ९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२3 या महिन्याभराच्या कालावधीत पथकाने ० ते ६ वयोगटातील 63 हजार 12 बालकांची तपासणी करण्यात आली. तर 6 ते 18 वयोगटातील 80 हजार 855 किशोरवयीन मुलामुलींची तपासणी केली. यापैकी व्याधिग्रस्त आढळलेल्या 2 हजार 438 बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा स्तरावरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.

व्याधिग्रस्त बालके

दात दाताचे आजार – 630

त्वचा रोग – 145

स्पीच डिले – 50

सततचा सर्दी खोकला – 50

दृष्टी दोष – 170

जन्मत:हृदयाशी निगडीत आजार – 05

दुभंगलेले होट/टाळू – 02

डोळ्यांचा तिरळेपणा – 05

 

आजाराच्या निदानामुळे उपचाला दिशा

अभियानांतर्गत बालकामधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळयांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, एपिलेप्सी अन्य आजाराची संदिग्ध रुग्णांवर त्वरीत औषधोपचार करणार आहेत. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार सोनोग्राफी, एक्स रे, ई.सी.जी. केला जाणार आहे.