वाऱ्याच्या वेगाने धावल्या 80 बैलजोड्या शंकर पटाची 71 वर्षाची परंपरा : अनेक नामांकित जोड्या दाखल : दर्दींची मोठी गर्दी

0

 

सावरगाव : ग्रामीण भागातील शंकर पटाला गत वर्षापासून राज्यात सुरुवात झाली. शंकर पटाची 71 वर्षांची परंपरा कायम ठेवत शंकर पट कमेटी, नरखेड तालुक्यातील सावरगावद्वारे (Savargaon in Narkhed Taluka) दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे़ रविवारी शंकटपटाच्या पहिल्या दिवशी नरखेड पंचायत समिती व कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनीचे आयोजन राणी लक्ष्मीबाई कृषी तंत्र विद्यालय, सावरगावचे प्रांगणात करण्यात आले. या ठिकाणी रविवारी ‘अ’ गटामध्ये 35 व ‘ब’ गटामध्ये 45 अश्या एकूण 80 बैलजोड्या (Bullocks ran in Shankarpat ) धावल्या. अनेक नामांकित जोड्या सावरगाव येथे शंकर पटात डेरे दाखल झाल्या आहे. आज सोमवारीही बैलबंड्यांच्या शर्यतीचा थरार हजारो शौकिनांच्या उपस्थितीत रंगला. एकीकडे विद्युत वेगाने धावणाऱ्या बैलजोड्या धावत होत्या, तर उपस्थितांकडून आवडीच्या जोडीसाठी चिअरअप केले जात होते.

पहिल्या दिवशी ‘अ’ गटात रामप्रसाद राठोड बैतूल यांची जोडीप्रथम (8.18 सेकंद) तर कोमल नांदूरकर, पुलगाव द्वितीय(8.20 सेकंद), आतिश वर्मा, वाशीम यांची जोडी तृतीय (8.30) सेकंद घेऊन तृतीय तर ‘ब’ गटामध्ये प्रथम मनोज भोंडवे, खैरी (8.81 सेकंद) द्वितीय भाऊसाहेब पवार, उमठा (8.93 सेकंद) तृतीय प्रकाश पाटील कुरेकर, भायवाडी (9.21 सेकंद) मध्ये आल्या आहेत. नरखेड तालुक्यातील सावरगाव परिसरातील हा शंकरपट पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अनेक जिल्ह्यातील पशुप्रेमी हा शंकरपट पाहण्यासाठी पोहोचले आहेत. बघणाऱ्यांचा उत्साह देखील ओसंडून वाहतो आहे. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतीउपयुक्त उपकरणांची माहिती देखील शेतकऱ्यांना मिळते आहे.

आयोजनासाठी शंकर पट कमेटीचे जगन्नाथ मेटांगळे, सुरेश गोडबोले, रमेश रेवतकर, रमेश जयस्वाल, गणपत घोडे, मनोज गोडबोले, उमेश सावंत, संजय कामडी, अजय घाडगे, मुकेश सावंत, प्रविण वासाडे, ज्ञानेश्वर बालपांडे, रामराव हिरूडकर, बशीर पठाण, संदेश भांडवलकर, अनिकेत सावंत, पंकज मेटांगळे, समीर गोडबोले सहकार्य करत आहे.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा