पैसे नसतील तर बायको मला विक सावकाराची अभद्र मागणी ; देसाईगंजमध्ये ऑडियो क्लिप व्हायरल

0

 

गडचिरोली :  अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या बळीराजाला राज्य सरकारने आर्थिक मदत देऊन आधार दिला. मात्र, शेतमालांचे भाव कोलमडल्याने पुन्हा संकट उभे ठाकले आहे. त्यात खासगी सावकार बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. खासगी सावकारांनी हिंमत कुठवर्यंत वाढली, ते दर्शविणारी एक ऑडिओ क्लिप सध्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये (Desaiganj of Gadchiroli District ) चांगलीच व्हायरल झाली आहे. यात तो सावकार दारू पिऊन कर्जदारा कडे पैशांची मागणी करीत आहेत. पैसे नसेल देत तर तुझ्या बायकोला मला विक (If you have no money, sell the wife), अशी अभद्र माणगीच त्यांने अश्लील भाषेचा वापर करीत केली आहे. दोघांत मोबाईलवर झालेले हे संभाषण समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल (Audio clip viral ) झाले आहे. एवढेच नव्हे तर तक्रार करण्यासाठी गलेल्या महिलेची समजूत काढून एका पोलिसाने त्या सावकाराकडून १५ लाख उकळल्याची चर्चा देखील शहरात सुरू आहे. या सर्वा प्रकाराने सर्वसामान्य शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून मदत मिळत नाही. सरकारचे स्पष्ट निर्देश असूनही राष्ट्रीयकृत बँकांकडूनही कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. असावेळी शेतकऱ्यांसाठी खासगी सावकारांचा एकमेव पर्याय उपलब्ध राहतो. विना परिश्रम अधिक नफा मिळत असल्याने संपूर्ण राज्यातच अवैध सावकारीला उत आले आहे. देसाईगंज शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचा धंदा चालतो. गरजूला वेळेवर कर्ज देत अव्वाच्या सव्वा व्याज वाढवून दुप्पट वसुली करण्याचेही प्रकार सर्रास चालतात. अशात एका राजकीय पक्षाचा नेता असलेल्या सावकाराने गावातीलच व्यक्तीला काही लाखांचे कर्ज दिले होते. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने मूळ रकमेवर व्याज लावून त्या सावकाराने कर्जदारकडे ८५ लाखांची मागणी केली. परंतु एवढी मोठी रक्कम तात्काळ देण्यास कर्जदाराने असमर्थता दर्शवली. यावरून त्या सावकाराने पैशांसाठी तगादा लावला. तो नेहमी कर्जदाराला फोन करून अर्वाच्च भाषेत बोलायचा. त्यांच्या संभाषणाची क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून यात तो सावकार दारू पिऊन कर्जदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत आहे. पैसे नसेल तर तू तुझ्या बायकोला मला विक, अशी मागणी केल्याचे स्पष्ट ऐकता येते. कर्जदाराच्या पत्नीने फोन आपल्याकडे घेतला असता तो तिच्यासोबतदेखील अतिशय खालच्या पातळीवर बोलला. या प्रकारामुळे संतापलेल्या त्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली, तो सावकारही तेथे येऊन प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करू लागला. शेवटी एका कागदावर दोघांची स्वाक्षरी घेत प्रकरण आपापसात मिटवण्यात आले. मात्र, यात एका पोलिसाने त्या सावकाराकडून १५ लाख उकळल्याची चर्चा आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा