व्हीसीएवर 4 क्रिकेट बुकींना अटक

0

नागपूर :भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी चार क्रिकेट बुकिंना मैदानावरूनचअटक केली आहे. वर्धा रोडवरील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्थित स्टेडियमवर हे बुकी क्रिकेट सामन्यावर खायवाडी लगवडी करताना आढळून आले.

गेले काही दिवस पोलिस या बुकींच्या मागावर होते.बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरातील जामठास्थित व्हीसीए मैदानावर सुरू आहे. अटकेतील आरोपींमध्ये मुंबई, भंडारा,नागपूरचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्राने दिली. यात बारा लोक सहभागी असल्याची माहिती असल्याने आणखी काही आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येतील असे बोलले जाते. हे चार दलाल स्टेडियम बाहेरच्या दलालांशी संपर्कात राहून लाईव्ह आणि टेलिकास्ट वेळे दरम्यानच्या घडामोडींची सूचना मोबाईलवर देण्याचे काम करीत होते. नागपूर हे गेली अनेक वर्ष मध्य भारतातील क्रिकेट सट्टासाठी महत्त्वाचे केंद्र राहिले आहे हे विशेष. या दलालाकडून मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा