आज येणार अनिल देशमुख, राष्ट्रवादीतर्फे होणार जंगी स्वागत

0

 नागपूर :राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख दीड वर्षानंतर उद्या 11 फेब्रुवारी रोजी नागपुरात येत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या सिव्हील लाईन्स,जीपीओ चौकातील निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे जंगी स्वागत करण्याचे ठरविले आहे.

विमानतळावरील स्वागतानंतर वर्धा रोडवरील साई मंदिरात दर्शन, व्हेरायटी चौक गांधी पुतळा, संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. यानिमित्ताने माजी मंत्री अनिल देशमुख यांचे निर्दोषत्व सिद्ध करणाऱ्या सुमारे एक लाखावर पत्रकांचे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, जनतेमध्ये वितरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देखील दोन दिवस विदर्भात आहेत. नागपूर व सेवाग्राम, वर्धा येथे त्यांचे विविध कार्यक्रम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे,प्रदेश पदाधिकारी शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वात हे पत्रक वितरित केले जाणार आहे. हायकोर्टाने दिलेला दिलासा, सीबीआय, ईडीच्या तपासात काहीही हाती न लागणे या सर्व गोष्टींचा संदर्भ यात देण्यात आला असून आपण कुठला गुन्हा केला ? 30 वर्षे बेदाग राजकारण ,समाजकारण करीत असताना आपल्याला उगीचच अडकवण्यात आले अशा प्रकारची अनिल देशमुख यांची भूमिका यानिमित्ताने जनतेत पोहोचविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा