भारतात प्राण्यांच्या 406 नवीन प्रजातींची नोंद

0

भारतीय भूभाग २३.३९ टक्के वने आणि वृक्षाच्छादनाने व्याप्त आहे. या भूभागावर विविध जिवांचा अधिवास आहे. पैकी अनेकांपासून आजही आपण अनभिज्ञ आहोत. झेडएसआयने आजपर्यंत ५३९२ न्यू स्पेसिज नोंदविलेल्या आहेत. झेडएसआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था असून १ जुलै १९९६ मध्ये तिची स्थापना झाली. कोलकता येथे संस्थेचे मुख्यालय असून महाराष्ट्रातील शास्त्रा पुणे येथे आहे. दरवर्षी या संस्थेकडून ‘अॅनिमल डिस्कव्हरीज न्यू स्पेसिज रेकॉर्ड’ हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. यंदाचा २३६ पानांचा असून त्यात २०२१ मध्ये देशभरातून ५४० प्रजातीच्या प्राण्यांची (जिवांची नोंद पिण्यात आली आहे. यात सस्तन उभयचर जलचर, सरपटणारे, पक्षी, साप, कीटक आदींचा समावेश आहे.देशभरात गत वर्षात प्राण्यांच्या ५४० प्रजाती आवळल्या आहेत. यातील तब्बल ४०६ प्रजाती नवीन (न्यू स्पेसिज विश्वात पहिल्यांदाच नोंद असून १३४ प्रजातींची देशातून पहिल्यांदाच (न्यू रेकॉर्ड भारतात होत्या; पण नोंद नव्हती) नोंद घेण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील २७ प्रजातींचा समावेश आहे. पैकी २२ न्यू स्पेसिज तर ५ न्यू रेकॉर्ड आहेत. भारतीय प्राणी सर्वेक्षण (झेडएसआय) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण / ZSI) ही पर्यावरण आणि वन मंत्रालयाची अधीनस्थ संस्था आहे. 1916 मध्ये भारतीय उपखंडातील जीवजंतूंच्या विविधतेने समृद्ध असलेल्या आपल्या ज्ञानात वाढ करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली.

मराठवाड्यातून दोन नवीन प्रजाती

२०११, १२ आणि १६ या तीन वर्षांत औरंगाबाद जिल्ह्यातून झेडएसआयने चार नवीन प्राण्यांची नोंद घेतली आहे. २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातून दोन नोंदी घेण्यात आल्या आहेत. यानंतर २०१९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून तीन प्रजातींची नोंद घेण्यात आली होती. २०२० च्या अहवालात मराठवाड्यातून कोणतीही नोंद नव्हती. २०२१ च्या अहवालात परभणी व नांदेड जिल्ह्यातून कीटकांच्या दोन प्रजाती नोंद घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही प्रजाती न्यू स्पेसिज ठरल्या आहेत. राज्यात आढळलेल्या न्यू स्पेसिजपैकी या दोन आहेत.
महाराष्ट्रातून

बारा वर्षात आढळले ४६५२ प्राणी

२०१० पासून ते २०२१ या २२ वर्षात देशात झेडएसआयने ४६५२ प्राण्यांच्या प्रजातींची नोंद घेतलेली आहे. पैकी ३२०६ प्रजाती न्यू स्पेसिज ठरल्या. तर १४४६ न्यू रेकॉर्ड आहेत. यात इतरांचे देखील संस्थात्मक आणि वैयक्तिक योगदान आहे. २०१० मध्ये २८५, २०११-२५९.२०१२ २४२, २०१३-३०२, २०१४- २३७, २०१५- ३६७, २०१६- ३१४, २०१७ ४७४, २०१८-५११, २०११- ४८४, २०२०- ५५७ तर २०२१ मध्ये ५४० प्राण्यांचा समावेश आहे.देशातून नवीन नोंद घेतलेल्या (न्यू रेकॉर्ड) सर्वाधिक ९७ प्रजाती केरळ राज्यातील आहेत. महाराष्ट्रात २७ प्रजाती आवळल्या असून त्या सातारा, नाशिक, पुणे, नागपूर, आहेत.

रायगढ़ रत्नागिरी, कोल्हापूर, नगर, मुंबई, सिंधदुर्ग आदी जिल्ह्यांतून नोंदविण्यात आल्या आहेत. पैकी २५ प्रजाती या नवीन (न्यू स्पेसिज)

राज्यनिहाय प्रजातींची नोंद

केरळ (९७), पश्चिम बंगाल (६०), तमिळनाडू (४७), कर्नाटक (४५), अरुणाचल (४४), अंदमान (३२), मेघालय (३०), महाराष्ट्र (२७), जम्मू-काश्मीर (२०), मिझोराम (१८), आंध्रप्रदेश (१५), हिमाचल (१३), ओरिसा (१२), सिक्किम (११), उत्तरप्रदेश (१०) गोवा (६) छत्तीसगड (५), मणिपूर (५), गुजरात (४), नागालैण्ड (७), लक्षद्वीप (८), तेलंगणा (१), उत्तराखंड (१५) आसाम (१) बिहार (२), मध्यप्रदेश (३), त्रिपुरा (२).

Shankhnaad News | भारतात प्राण्यांच्या 406 नवीन प्रजातींची नोंद

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा