18MNAT4 उत्तरप्रदेशात 54 जणांचा उष्माघाताने मृत्यू
तब्बल 400 जणांना रुग्णालयात दाखल केले
लखनऊ, 18 जून : उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसात तापमान वाढीने हैदोस घातला आहे. राज्याच्या बलिया येथील जिल्हा रुग्णालयात 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 जणांना इस्पीतळात दाखल करण्यात आलेय. दरम्यान या मृत्यूंची वेगवेगळी कारणे असली तरी उष्णता वाढ हे देखील प्रमुख कारण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
उत्तर प्रदेशमध्ये प्रंचड उष्णता वाढली आहे, बऱ्याच भागात तापमान 40 डिग्रीच्या पुढे जाताना दिसून येत आहे.मृतांची अचानक वाढलेली संख्या आणि रुग्णांना ताप, श्वास घेताना त्रास होणे आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सध्या आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्य आले आहे. बलिया येथील रुग्णालय अधिक्षक एस के यादव यांनी सांगितले की 15 जून रोजी 23 तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजमगढ सर्कलचे अतिरिक्त स्वास्थ निदेशक डॉ. बीपी तिवारी यांनी सांगितलं की लखनऊ येथून एक टीम चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे. ही टीम हा अनोळखी आजार आहे का याबद्दल माहिती घेईल. जास्त उष्णता वाढल्याने सर्दीत श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण , मधुमेहाचे आणि ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना धोका वाढतो. तसेच तापमानाचा पारा वाढल्याने देखील अशा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो असा अंदाजही डॉक्टरांनी व्यक्त केलाय.