सिंचन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींच्या प्रस्तावांना मान्यता

0

-आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त सिंचन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 7,78,70,000 लक्ष रुपयांच्या 98 कामांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवंद्र फडणवीस यांनी मान्यता प्रदान केली आहे. सिंचन कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष मागणी केली होती.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच सिंचन तलावातून निघाणारे कालवे क्षतिग्रस्त झाल्याने रब्बी हंगामात सिंचन होणे नव्हेते. सिंचन कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याची दखल घेत बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीमधून विशेष बाब म्हणून सिंचन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सिंचन कालव्यांच्या 98 दुरुस्ती प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यातील सिंचन कालव्यांच्या दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी आज जारी केले. यामुळे आता या कालव्यांच्या दुरुस्तीची तातडीने कामे मार्गी लागणार असून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचन उपलब्ध होऊ शकणार आहे.