ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन

0

-भदंत ससाई यांच्या नेतृत्वात निघाली मिरवणूक
-विमानतळ बाबासाहेबांच्या पुतळ्यावर पुष्पवर्षाव


नागपूर :महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंदोरा बुध्द विहार समितीतर्फे इंदोरा येथून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या मिरवणुकीत इंदोरा, बुध्द विहाराचे सचिव अमित गडपायले यांच्यासह आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. तत्पूर्वी इंदोरा बुध्द विहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


भदंत ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खु संघाने सर्वप्रथम इंदोरा बुध्द विहार, इंदोरा चौक, संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली . यावेळी बुध्द वंदना घेण्यात आली.
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार. त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आज गरज आहे. असे मत भदंत ससाई यांनी व्यक्त केले. यावेळी पांढरे वस्त्र परिधान केलेल्या अनुयायांच्या हातात पंचशील ध्वज होते. भिक्खू संघ, उपासक-उपासिका सहभागी होते. याप्रसंगी भदंत भीमा बोधी, नागसेन, धम्मबोधी, मिलिंद, धम्मप्रकाश, महानाग, अश्वजित, आनंद, भिक्खुनी संघप्रिया यांचा समावेश होता. समारोप उंटखाना येथील बुध्दीस्ट सेमिनरीत झाला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा