90 टक्के शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात; सरकारकडून दिलासा नाही

0

यवतमाळ : शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेला कापूस, सोयाबीन हा नव्वद टक्के शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. भाववाढ होणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु, दमडी वाढली नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देण्याची घोषणा करण्यात आली.

प्रत्यक्षात जुन्याच विम्याची रक्कम मिळाली नाही. तर एक रुपयाच्या विम्याची रक्कम मिळणार का, हा प्रश्न आहे. अवकाळी पावसाने नुकसान झाले. संपामुळे त्याचे पंचनामे उशिरा करण्यात आले. एकामागून एक येणाऱ्या संकटामुळे शेतकरी पार उध्वस्त झाल्याचे चित्र आहे.