वर्धा – वर्धा जिल्ह्यातील पवनी हायवे रोडवर एक माकड जखमी झाल्याची घटनाआज सकाळी घडली. अज्ञात वाहनाने या माकडाला धडक दिली व वाहन तिथून पसार झाले.
हायवे रोडवर बराच वेळपर्यत माकड पडून होते. या रोडने काही लोक गेले असता त्यांना माकड रोडवर पडून आढळले. अखेरीस गजानन कडवे ,भालचंद्र भट, किरण कलोडे यांनी या वानराला भीमा ढगे यांच्या मारुती गाडीमध्ये टाकून पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले .
पशुवैद्यकीय दवाखान्यात संदीप श्रीरामे यांनी माकडावर उपचार केला. सदर घटनेची माहिती तातडीने वनरक्षक एस पवार , राऊंन्ड ऑफिसर सचिन कापकर यांना देण्यात आली.