मनोजच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये मोठा खुलासा, सरस्वतीचा ‘तो’ मेसेज ठरणार महत्त्वाचा पुरावा

0

ठाणेः सरस्वती साने हत्याकांड प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवल्याचा प्रखार काहि दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 6 जुलैपर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मागितली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहे. दोघांच्याही व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन महत्त्वाचे धागेदोरे आढळले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती वैद्यला मनोजसोबतचे नाते तोडायचे होते. तिने तसे मेसेजही त्याला केले होते. मनोज-सरस्वती राहत असलेल्या घरातून पोलिसांनी चार फोन जप्त केले आहेत. त्यातील एक फोनमधून सरस्वती आणि मनोज यांच्यात झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.

 

 

26-27 मे दरम्यान सरस्वतीने मनोजला अनेक मेसेज पाठवले होते. त्यात तु माझी फसवणूक केलीयेस, तु विश्वासघातकी आहे. मला हे नातं तोडायचं आहे, अशा आशयाचा एक मेसेज पोलिसांना सापडला आहे. या मेसेजमधून सरस्वतीला मनोजसोबत राहायचं नव्हते, हे स्पष्ट होतंय. मनोज-सरस्वतीमधील हे चॅट्स पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत आरोपी मनोज सानेने तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून आमच्यात फिजिकल रिलेशन नव्हते, असा दावा केला होता. सरस्वती लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र त्याने लग्नाला नकार दिला. त्याच्या दुर्धर आजारामुळं त्याला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं.

 

मनोजच्या आजाराबाबत सरस्वती वैद्यलादेखील ठावूक होतं. त्याची औषधे घरात सापडली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत. तसंच, मनोज सानेची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून जे.जे रुग्णालयातून अहवाल अद्याप आले नाहीत. अहवाल आल्यानंतरच तो खरं बोलतोय का हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी मनोज आणि सरस्वतीमध्ये वाद झाले होते. वैद्यने त्याला इतर डेटिंग अ‍ॅप्सवर महिलांसोबत चॅट करताना बघितलं होतं. त्यावरुन दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंकर सरस्वती रागाने बेडरुममध्ये गेली. तिच्यापाठोपाठ मनोजही गेला व तिच्यासोबत शारीरिक लगट करु लागला. मात्र तिने संबंध ठेवण्यास नकार दिला. रागाने त्याला बाहेर काढले व दरवाजा आतून बंद केला.

दरम्यान, मनोज सानेने ताकातून तिला किटकनाशके दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सरस्वतीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहासोबत फोटो काढले. व नंतर चाकू, इलेक्ट्रिक कटरने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न तेला.