‘त्यांची हातभर…’, आम्ही रस्ता बदलणार नाही

0

संजय राऊत यांचा शिंदेसेनेवर निशाना : शिंदेंच्या सभात ३०० रुपयांत माणसं आणल्याचा दावा
मालेगाव. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गमावल्यांनंतर ठाकरे गटाकडून सोबत असणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणऊन राज्यभर विभागवार जाहीर सभा घेण्यात येत आहेत. याच मालिकेत उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा (Public meeting of Uddhav Thackeray at Malegaon today ) होणार आहे. सभेच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) मालेगाव येथे तळ ठोकून आहेत. आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, माझ्या भाषेत मी म्हणेन, उद्धव ठाकरेंच्या या सभेमुळे लोकांची हातभर फाटली आहे. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना रस्ता बदलण्यास सांगितले आहे. पण, उद्धव ठाकरे रस्ता बदलणार नाहीत. आम्ही लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. शिंदेंच्या सभेसाठी ३०० रुपयांत माणसं आणावी लागल्याचा (People had to be brought for 300 rupees for Shinde’s meeting ) हल्लाबोलही राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातल्या सभेबद्दल देशभरातल्या राजकीय वर्थुळात चर्चा आणि उत्सुकता आहे. देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडींबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा रेकॉर्डब्रेक हा शब्दही कमी पडेल इतकी मोठी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या खेड येथे मोठी सभा घेतली होती. ही सभा यशस्वी झाली. त्यानंतर शिवसेनेलाही उत्तर सभा घेऊन उत्तर द्यावे लागले. आता उद्धव ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा मालेगाव येथे होणार आहे. खेड येथील शिवसेनेच्या सभेलासुद्धा मोठी गर्दी झाली होती. तोच धागा पकडून राऊत यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केला. ते म्हणाले की, या सभेला कोणी भाड्याने माणसे आणणार नाही. तिकडे (शिंदे गट) सभेसाठी ३०० रुपये ते ५०० रुपये रोजावर माणसे आणली जातात. पण, मुख्य भाषण सुरू झाले की निघून जातात. या लोकांना समोर कोण बोलत आहे याची माहिती नसते. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. अनेक संस्थांनी यासाठी सुट्ट्या दिल्या आहेत, कामे थांबवली आहेत. ही सभा महाराष्ट्राला दिशा देणारी असेल. शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार आणि महिलांसह सर्वांनी या सभेला यावे, असे ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा