ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल : अनेकांच्या भूवया उंचावल्या
दिल्ली. सूरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर लोकसभेतील त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. त्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे (Politics in the country has heated up). सत्ताधारी – विरोधकांकडून एकमेकांवर हल्ले- प्रतिहल्ले केले जात आहे. आंदोलनांचा क्रमही सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच राहुल गंधी यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल केला (Twitter profile has been changed) आहे. ‘अपात्र लोकसभा सदस्य’ असा मोठा बदल त्यांच्या प्रोफाईलवर दिसून येत आहे. ते वाचनाऱ्या प्रत्येकाच्याच भूवया आपसूकच उंचावत आहेत. प्रोफाईलमधील बदल तशी सामान्य बाब आहे. त्याकडे फारसे कुणी लक्षही देत नाही. पण, राहुल गांधी यांच्या प्रोफाइलमधील बदल लक्षवेधी ठरला आहे. अद्याप त्यावर जाहीर प्रतिक्रिया उमटली नसली तरी राजकीय वर्तुळात त्यावरून चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांनी २०१९ च्या प्रचारसभेत चोरों का सरनेम मोदी क्यो होता है, असा प्रश्न उपस्थित केला होता. या विधानावरून राजकीय वातावरण तापले होते. मोदी आडणाव असणाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत मानहानीचा दावे दाखल केले होते. गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावरील सुनावणी चार वर्षांपासून सुरू होती. शुक्रवारी या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने कायद्यानुसार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. भविष्यात त्यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करता येणार आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्याची प्रक्रिया घाई-घाईत करण्यात आल्याचा दावा काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यावेळी भाजपने ही कारवाई योग्य ठरवित राहुल गांधी यांचे विधान मोदी समाजासह संपूर्ण ओबीसींचा अपमान करणारे असल्याचा दावा करीत आंदोलनांची मालिका सुरू केली आहे.
राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी यांनी ट्विटर बायोमध्ये बदल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि पक्षाअध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांच्या नेतृत्वात राजघाटावर संकल्प सत्याग्रह सुरू आहे.