गडचिरोलीत आगळा वेगळा सामूहिक विवाह सोहळा

0

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह आदिवासी जोडपी अडकली विवाहबंधनात

   गडचिरोली. वऱ्हाडी मंडळींची सकाळपासून लगबग सुरू होती. वाद्यांचे सूर घुमले. वरात निघाली. अगदी वाजत गाजत वरात मंडपी पोहोचली. रितिरीवाजानुसार विवाहाचे सोपस्कार पार पाडले गेले. अगदी अन्य लग्नसोहळ्यांप्रमाणेच गडचिरोलीतही आज विवाह सोहळा पार पडला (mass marriage ceremony was held in Gadchiroli). पण, हा संपूर्ण सोहळा अनेक अर्थांनी आगळा-वेगळा ठरला. आत्मसमर्पण केलेल्या ८ नक्षलवाद्यांसह १२७ आदिवासी युवक-युवती विवाहबंधनात अडकले (127 tribal youths, including 8 surrendered Naxalites got marriage). त्यानंतर जेवणावळीचा क्रम सुरू आहे. नागपूरची मैत्री परिवार संस्था (Maitri Parivar Sanstha ) व गडचिरोली शाखा तसेच, गडचिरोली पोलिस दल (Gadchiroli Police), दादालोरा खिडकी पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन येथे सकाळी विवाह संस्कार पार पडले. या सोहळ्याकडे अवघ्या विदर्भाचे लक्ष लागले आहे. जोडप्यांचे नातेवाईक, आयोजक प्रतिष्ठित निमंत्रितांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. याशिवाय फेसबूक लिंकद्वारे आनेकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचा अनुभव घेतला.

गेले काही दिवस या सोहळ्याची तयरी सुरू होती. ५०० बाय ८० चौरस फूटाचा भव्य डोम उभारण्‍यात आला आहे. एकाचवेळी ३५०० लोकांच्‍या बसण्याची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्‍ह्यातील विविध भागातून आलेल्‍या या उपवर-वधूंची १० झोनमध्‍ये विभागणी करण्‍यात आली. आत्‍मसमर्पित नक्षलवादी उपवर-वधूंसाठी ‘नवजीवन’ हा स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे. विवाहस्थळी चार वेगवेगळ्या आकाराचे मंडप उभारण्यात आले आहे. प्रत्येक मंडपाला आदिवासी जमातीतील दैवत व शूरविर पुरुषांची नाव देण्यात येणार आहे. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा यांचे नाव तर आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आणि मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या भोजन कक्षाला वीर राणी दुर्गावती यांचे नाव देण्‍यात आले आहे.