अनैतिक संबंध ठरले कारण : एकीचा दगडाने ठेचून तर दुसरीचा उशीने तोंड दाबून खून
नागपूर. गुन्हेगारीचा ग्राफ उंचावत असल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे. त्यातच आता एकाच दिवशी दोन महिलांच्या खुनाच्या घटना उघडकीस (Incidents of murder of two women were revealed on the same day ) आल्याने उपराजधानी हादरली आहे. दोन्ही हत्याकांड अनैतिक संबंधातून (immoral relationship ) घडल्याचे समोर आले आहे. पहिली घटना वाठोडा पोलिसांनी उघडकीस आणली आहे. अनैतिक संबंधातून ४२ वर्षीय महिलेला हिंगणा परिसरातील रुई शिवारात प्रियकराने नेऊन तिचा दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दीपक इंगळे (४०) रा. साईबाबानगर याला अटक करण्यात आली आहे. तो आपली बसचा चालक आहे. तर, दुसऱ्या घटनेत हुडकेश्वर येथे मामेभावासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली. सातत्याने गंभीर स्वरूपाच्या घटना उघडकीस येत असल्याने नागरिक चिंतेत असून पोलिस दलाचेही टेन्शन वाढले आहे.
इतरांशी प्रेमसंबंधाची शंका
दीपक इंगळेची काही वर्षांपूर्वी मैत्रिणीच्या माध्यमातून महिलेशी ओळख झाली होती. पुढे प्रेमसंबंध जुळले. ते नेहमीच एकमेकांना भेटायचे. दरम्यान दीपक नेहमीच तिला आपल्या दुचाकीने हिंगण्यातील रुई परिसरात घेऊन जायचा. गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यावर दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याची शंका घेत होता. त्यातून गुरुवारी तो महिलेला घेऊन गेला. यावेळी दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणाने त्याने तिच्याशी वाद घातला. घरी परतण्यासाठी मागे वळताच, तेथील दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात हाणला. त्यामुळे जखमी झाल्याने ती खाली कोसळली. यानंतर त्याने दगडाने वार करून तिचा खून केला आणि पसार झाला. दरम्यान उशीर झाल्यानंतरही पत्नी घरी न परतल्याने पतीने वाठोडा ठाण्यात ती बेपत्ता असल्याची सूचना केली. शुक्रवारी पोलिसांनी तक्रार दाखल केली. दरम्यान तपासात त्यांनी तिच्यासोबत संबंधित असलेल्यांची चौकशी केली असता, त्यात दीपकला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान महिलेचा खून केल्याची माहिती दिली. आरोपीने सांगितल्यानुसार पोलिसांनी हिंगण्यातील रुई परिसर गाठला. मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
लिव्ह इनचा थरारक अंत
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मामेभावाने ३० वर्षीय आतेबहिणीचा वादातून खून केला. ही घटना शनिवारी (ता.२५) दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास घडली. राजू शंभुजी पानतावणे (वय ४०) असे आरोपीचे तर पायल आकाश गजभिये (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पायलचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ती नागपुरात राहायला आली. यावेळी तिचे मामेभाऊ राजू पानतावणे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही एक वर्षापासून ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी दोघांत वाद झाला. रागाच्या भारात राजूने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. याबाबत कळताच हुडकेश्वर पोलिस तेथे पोहोचले आणि राजूला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.