
सोलापूर (Solapur)- आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघातून मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, माढा आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक गावातून 4 उमेदवार लोकसभेसाठी अर्ज भरणार आहेत.
लोकवर्गणी जमा करून सकल मराठा समाज उमेदवारी भरण्याचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ठराव मंजूर केला. सोलापूर शासकीय विश्रामगृहात आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक पार पडली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सोडवला नसल्याने मराठा समाजाने ही भूमिका घेतली असल्याचे
माऊली पवार (समन्वयक, सकल मराठा समाज) यांनी सांगितले.
Related posts:
नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगली भव्य चित्रकला स्पर्धा!
May 30, 2026MAHARASHTRA
नागपूरकरांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणार चालना? मुरलीधर मोहोळ यांचे संकेत
May 29, 2026Artical Blog
शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा राज्य सरकारचा डाव हाणून पाडू काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार...
May 29, 2026Artical Blog
















