नागपूर रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला!

0

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी मोठा अपघात टळला. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 जवळील एका दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने आग वेळेत आटोक्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ७ जवळील एका दुकानाच्या स्टोअर रूममधून धूर निघत असल्याचे प्रवाशांना दिसले. यानंतर स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा दल आणि अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुकानात रेल्वेमध्ये वापरण्यात येणारे पंखे, एसी आणि इतर विजेच्या वस्तूंची दुरुस्ती केली जाते. आगीत दुकानातील अनेक सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही आग कशी लागली याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.